बकर ईद व आषाढी एकादशी सर्व समाज बांधवांनी शांततेच्या वातावरणात साजरी करावी -पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांचे आवाहन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
सोशल मिडियाच्या माध्यमातुन ईतर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत करू नये तसेच शासनाच्या आदेशाचे पालन करून बकर ईद व आषाढी एकादशी सर्व समाज बांधवांनी शांततेच्या वातावरणात साजरी करावी असे आवाहन पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी नागरीकांना केले आहे.
यावल पोलिस ठाण्याच्या आवारात बकर ईद व आषाढी एकादशीच्या पार्श्वभुमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजीत शांतता समितीची बैठक यावल पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली.यावेळी बैठकीत प्रशासनाच्या वतीने सुचना देतांना पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर म्हणाले की,आपल्या परिसरात कोणत्याही घटनेमुळे दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होवुन कायदा आणी सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता नागरीकांनी घ्यावी तसेच शासनाच्या वतीने गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करण्यास मनाई केली असुन सोशल मिडियाच्या माध्यमातुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतीही पोस्ट टाकु नये याबाबत सर्व नागरीकांनी शासन आदेशाचे परिपुर्ण पालन करावे असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मानगावकर यांनी दिली.यावेळी हाजी शब्बीर खान,निलेश गडे,भगतसिंग पाटील,चेतन अढळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या बैठकीला शांतता समितीचे सदस्य हाजी शब्बीर खान,राष्ट्रवादीचे प्रा.मुकेश येवले,शांतता समितीचे जेष्ठ सदस्य गोपाळसिंग पाटील,विजय सराफ,भगतसिंग पाटील,माजी नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ,माजी नगरसेवक असलम शेख नबी,भाजपाचे निलेश गडे,हाजी ईकबाल खान,माजी नगरसेवक गुलाम रसुल गुलाम दस्तगीर,मनसेचे चेतन अढळकर,नितिन सोनार,काँग्रेसचे हाजी गफ्फार शाह,हबीब मंजर,किशोर नन्नवरे,अलीम शेख यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.