Just another WordPress site

“संभाजी महाराज हत्येच्या कटात मुघल बादशहाबरोबर भारतातील हिंदू भटजीही”, प्रकाश आंबेडकर यांचे परखड मत

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येच्या कटात हिंदू भटजींचाही समावेश होता असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.सध्या देशात जुन्या राजांची उदाहरणे देऊन समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु ही खरी वस्तुस्थिती नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली आहे.संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले की,देशात सध्या जुन्या राजांचे उदाहरण देऊन समाजात दुफळी निर्माण केली जात आहे पण तशी वस्तुस्थिती नाही संभाजी महाराज हत्येच्या कटात मुघल बादशहाबरोबर भारतातील हिंदू भटजीही होते.हत्येच्या कटात त्यांचाही सहभाग होता यावर इतिहासकारांनी सविस्तर लिहायला हवे जेणेकरून देशात पुन्हा कुणी जयचंद येणार नाही देशाचे स्वातंत्र जाणार नाही.संभाजी महाराजांच्या हत्येत हिंदुंचाही समावेश होता असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असे विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की “अर्थ सरळ आहे.”संभाजी महाराजांच्या हत्येवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,“संभाजी महाराज संगमेश्वरावर येथे गुप्त मोहिमेवर होते असे मानायला हरकत नाही.या मोहिमेची माहिती औरंगाजेबपर्यंत कशी पोहोचली? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे या देशात ज्या राजांचे स्वातंत्र राज्ये होती ती जयचंदांमुळे अस्ताला गेली. औरंगजेबाने संभाजी महाराजांना ज्याप्रकारे देहदंड दिला तो निंदनीय आहे त्याची आम्ही निंदा करतो पण संभाजी महाराजांना पकडून नेणारेही महत्त्वाचे आहेत.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की,नाशिकमध्ये कडू नावाचे लेखक आणि प्राध्यापक आहेत त्याचे औरंगजेब आणि मनुवाद हत्या संदर्भात एक पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की,औरंगजेबाच्या सल्लागार समितीमध्ये हिंदू कायद्याच्या संदर्भात सल्ला देणारे आबा भटजी होते त्यांनीच संभाजी महाराजांना शिक्षा कशी द्यावी? हे सुचवले होते असा इतिहासात उल्लेख आहे.मनुस्मृतीप्रमाणे संभाजीमहाराजांना शिक्षा देण्यात यावी असा सल्ला भटजींनी दिला होता.महाराजांना शिक्षा देताना भटजींचा सल्ला अमलात आणला असा आरोप आहे असे मी मानतो त्यामुळे भारताच्या इतिहासात जे-जे लोक स्वतंत्र राज्य निर्माण करायला निघाले होते अशा राज्यात जयचंद निर्माण झाले व या जयचंदानी स्वतंत्र राज्य संपवली त्यामुळे आपण औरंगाजेबाचा जेवढा निषेध करतो तेवढा निषेध या जयचंदांचाही करायला हवा.संभाजी महाराजांना पकडण्यात गणोजी शिर्के यांचा हात होता हे सरळ दिसतय.संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे हा सल्ला आबा भटजी यांनी दिला या दोघांचा निषेध न करता आणि थेट औरंगजेबाचा निषेध करतो हे वस्तुस्थितीला धरून नाही.भारताच्या इतिहासात असे जयचंद अनेकदा निर्माण झाले येथून पुढे असे जयचंद निर्माण होणार नाहीत याची दक्षता आपण घ्यायला हवी असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.