Just another WordPress site

वाळू माफियांकडून मुजोरी करीत मंडळ अधिकाऱ्यास मारहाण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

अनाधिकृत वाळू वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर येथील महसूल विभागाच्या पथकाव्दारे कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाकडे आणत असतांना ट्रॅक्टर मालकासह दोघांनी साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करून गटारीत व काट्यात ढकलून दिले प्रसंगी मंडळ अधिकारी यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला असता त्यांचे दिशेने दगडफेक करून त्यांना जखमी केल्याची नुकतीच समोर आली आहे.याबाबत मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालकांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू वाहतुक प्रतिबंधात्मक उपायासाठी तालुक्यातील साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांचे सह तलाठी मधुराज पाटील  व  कोतवाल विकास सोळंके हे गस्तीवर असतांना तालुक्यातील डांभुर्णी येथून कोळन्हावी येथील तापी नदीपात्रात जाणाऱ्या नाल्यात निळ्या रंगाचे ट्रॅक्टर दिसल्याने पथकाने त्यास थांबवून तपासणी केली असता ट्रॅक्टरमध्ये वाळू दिसून आली यावेळी पथकाने परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही.सदरहू ट्रॅक्टर चालकाने कोळन्हावी येथील सुपडू रमेश सोळुंके यांचे ट्रॅक्टर असल्याचे सांगितले व ट्रॅक्टर चालकांनी हायड्रोलिकद्वारे वाळू खाली करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असता पथकाने तात्काळ शासकीय वाहनास बोलावून ट्रॅक्टर कार्यवाहीसाठी यावलकडे आणत असताना ट्रॅक्टर चालकाने नावरे फाट्या जवळून शिरसाड गावाकडे पळ काढला त्याचा पाठलाग करून साकळी येथील मुस्लिम कब्रस्तानजवळ ट्रॅक्टर अडवीला असता ट्रॅक्टर मालक सुपडू रमेश सोळुंके चालक आकाश अशोक कोळी,गोपाळ प्रल्हाद सोळुंके यांनी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना मी तुला जिवंत ठेवणार नाही म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जगताप यांना गटारीत व काट्यात फेकून दिले.सचिन जगताप यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला असता त्यांचे दिशेने दगड गोटे भिरकावले.याबाबत ट्रॅक्टर मालकांसह दोन जणांनी शासकीय कामात अडथळा आणून मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना मारहाण करून दुखापत केल्याचे कारणावरून यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.