धामणगांव बढे व रोहिनखेड येथील मुस्लिम समाजबांधवांच्या पुढाकारातुन आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय
सादिक शेख,पोलीस नायक
धामणगांव बढे (प्रतिनिधी) :-
येत्या २९ जून रोजी वारकरी बांधवांचा पवित्र सण आषाढी एकादशी व मुस्लिम समाजबांधवांची बकरी ईद असून धामणगाव बढे व रोहिनखेड येथील येथील मुस्लिम समाजबांधवांच्या पुढाकारातुन आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.सदरील निर्णयाचे सर्वच थरातून जोरदार स्वागत करण्यात आले आहे.
आषाढी एकादशी व बकरी ईदनिमित्त धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.२७ जून मंगळवार रोजी शांतता समेतीची बैठक घेण्यात आली.यावेळी उपस्थित येथील मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देता ईदच्या दुसर-या दिवशी दि.३० जून शुक्रवार रोजी कुर्बानी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे निवेदन मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांना देण्यात आले.प्रसंगी सदरील निर्णयाचे हिंदू बांधवांनी जोरदार स्वागत करण्यात आले.या निर्णयाने राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यास बळ मिळणार आहे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.या बैठकीला सरपंचपती अलिम कुरैशी,माजी सरपंच असलम खान,ग्रामपंचायत सदस्य शेख सादिक,मो.अकील,रोहिनखेड,सैय्यद बिस्मिल्लाह,शेख मुजजमील,रोहिनखेड,माजी,उपसरपंच अफसर शेख,सामाजिक कार्यकर्ते नईम बागबान,मो.ईसेखा रोहिनखेड,कलिम कुरैशी,शेख खालेद,शेख ताहेर तसेच रोहिनखेड व धामणगाव बढे गांवातील मस्जिदचे सर्व मौलाना आदींनी पुढाकार घेतला.दरम्यान या निर्णयामुळे धामणगांव बढे ठाण्याअंतर्गत सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून गावात असलेल्या सर्वधर्मीय एकजुटीने सकारात्मक चित्र समाजापुढे येईल असा आमचा निकोप हेतू आहे असे सरपंचपती शेख अलिम कुरैशी यांनी म्हटले आहे.