यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील हिंगोणा पंचायत समिती गणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत यावल काँग्रेस कमिटीतर्फे आज दि.२८ जून २३ बुधवार रोजी सावखेडा हिंगोणा जिल्हा परिषद गटातील हिंगोणा पंचायत समिती गणात बूथ अभियानाअंतर्गत सम्पर्क अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.या अभियानास नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद देण्यात आला.
सदरील अभियान आमदार शिरीषदादा चौधरी,माजी खासदार उल्हास पाटील व जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली व पंचायत समिती गटनेते शेखर पाटील,काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जलील पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोणा,हंबर्डी,बोरखेडा खुर्द,सांगवी बु,बोरखेडा बु,डोंगर कठोरा ,चितोडा या गावात राबविण्यात आले.यावेळी शेतकी संघाचे चेअरमन सुनील फिरके,पंचायत समिती सदस्य सर्फराज तडवी,गटप्रमुख धीरज पाटील,गणप्रमुख महेश राणे,सह गणप्रमुख धनराज पाटील,हिंगोणा येथे राजेंद्र राणे,छगन गाजरे,संजय तडवी,हंबर्डी येथे सरपंच अलका पाटील,उपसरपंच रुपेश महाजन,ग्रामपंचायत सदस्या यामिनी नेहेते,उषाबाई पाटील,मीनाबाई सावकारे,पंकज तायडे,असलम तडवी,बोरखेडा बुद्रुक येथे सरपंच मनीषा पाटील,उपसरपंच रमजान तडवी,ग्रामपंचायत सदस्य राहुल भारंबे,रफिक तडवी,सांगवी येथे सरपंच रशीद तडवी,उपसरपंच विकास धांडे,माजी सरपंच भालचंद्र भारंबे,ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ कोळी,पिरन तडवी,बोरखेडा खुर्द येथे जुम्मा तडवी,इकबाल तडवी,रहेमान तडवी,डोंगर कठोरा येथे डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,भोजराज पाटील,दिलीप तायडे,मयूर जंगले,संजय सरोदे,लीलाधर पाटील,प्रीतम राणे,प्रमोद पाटील,राहुल आढाळे,रबील तडवी,हुसेन तडवी,चितोडा सरपंच अरुण पाटील यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.