Just another WordPress site

यावल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विविध कमेटी रचनाबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

प्रदेश काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीच्या सुचनेनुसार व यावल तालुका काँग्रेस कमेटीतर्फे ग्रामस्तरीय काँग्रेस कमिटया व प्रभाग कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,आमदार शिरीषदादा चौधरी,माजी खासदार डॉ.उल्हास पाटील,माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्तरीय काँग्रेस कमेटी व मंडळ स्तरीय कमेटी तसेच बुथ कमेटी तयार करणे संदर्भात तालुका भर दोरे निश्चित करण्यात आले.त्या अनुषंगाने साकळी दहिगाव जि.प गटातील दहिगाव गणातील कोरपावली,महेलखेडी,दहिगाव, चुचाळे या गावात सदर अभियान राबविण्यात आले.प्रसंगी गावातील कार्यकर्ते व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर अभियानाला प्रचंड प्रतिसाद दिला.

सदर अभियानात माजी आमदार रमेशदादा चौधरी,प.स.गटनेते शेखरबापू पाटील,साकळी दहिगाव गटप्रमुख संदीपभैय्या सोनवणे,प्रदेश सरचिटणीस जलील पटेल,कोरपावली येथील काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते पिरण पटेल,सरपंच विलास अडकमोल,उपसरपंच हमीदाबी पटेल,ग्रा.प सदस्य सत्तार तडवी,आरिफ तडवी,महेबूब मेंबर,समाजसेवक मुक्तार पटेल,उमेश जावळे,शकिलसर तडवी,महेलखेडी सरपंच शरिफा तडवी,उपसरपंच जयंता पाटील,सुदाम पाटील,सलीम तडवी,ग्रा.प सदस्य अशोक तायडे,दिनकर पाटील,भिका पटेल,सरफराज तडवी,सुनील महाजन,अरविंद अडकमोल,भिकारी तडवी,दहिगाव सरपंच अजय अडकमोल,गणप्रमुख दिनकर फेगडे,सह गणप्रमुख प्रकाश कोळी,माजी सरपंच दिलीप पाटील,गौरव महाजन,रहीम पटेल,उल्हास महाजन,शेख इम्रान,विजय बाविस्कर,चुचाळे येथील जेष्ठ नेते नत्थु तडवी,रहेमान तडवी,पप्पू पाटील,योगेश पाटील,सलीम तडवी यांच्यासह ग्रामस्थ,युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.