यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील साने गुरुजी शाळेमध्ये महात्मा बसवेश्वर,छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रपिता ज्योतिराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती संभाजी महाराज,लोकमाता अहिल्याबाई होळकर तसेच छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांचा जीवन संदेश अभियान अंतर्गत बामसेफतर्फे नुकतेच प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सदरील शिबीराचे उदघाटन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद प्रदेश सचिव मिनाताई तडवी तसेच बामसेफ प्रचारक व प्रशिक्षक शुद्धोधन खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी त्यांनी वर्तमानात काळात मूलनिवासी बहुजनांना भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या व त्यांचे निराकरण कसे करता येईल तसेच वाढती बेरोजगारी,शेतकरी आत्महत्या,आदिवासींचे अलगिकरण, भुखबळी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
संपूर्ण भारतात तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबीर दि.१८ जून व २५ जून या कालावधीत घेण्यात आले असून यावल येथे दि.२५ जून रोजी घेण्यात आले.यावेळी हाजी हकीम,शशिकांत सावकार,जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा,मो.शफी शेख रफीउद्दिन,बामसेफ तालुका अध्यक्ष मलक आबीद,विजय ननावरे,दिलीप तायडे,भानुदास महाजन,ज्ञानेश्वर सोनवणे माजी ग्राम पंचायत सदस्य,बाळू केदारे,प्रभाकर तायडे,संतोष तायडे,प्रवीण अडकमोल (ता.अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युमन्य वारडे यांनी केले तर आभार पंकज तायडे (जिल्हा उपाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा) यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर.जी.बावस्कर,मयूर तायडे,कुंदन तायडे, (बहुजन क्रांती मोर्चा ता. संयोजक),आदेश लोंढे यांनी परिश्रम घेतले.या प्रशिक्षण शिबराला बहुजन समाजातील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व प्रतिष्टीत मान्यवर उपस्थित होते.