सादिक शेख,पोलीस नायक
मोताळा तालुका (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील धामणगाव बढे येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा काल दि.२९ जून गुरुवार रोजी सकाळी ८.३० वाजता सामूहिक नमाज अदा करून ईद उल अजहा (बकरी ईद) उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने धामणगाव बढे येथील गावातील मुस्लिम बांधव जामा मस्जिद जवळून अल्लाह अकबर अल्लाह अकबर अशा घोषणा देऊन गावातून बाजार चौक शिवद्वार मार्गे ईदगाह मैदानावर पोहोचले व तेथे जामा मस्जिदचे इमाम हनीफ मिल्ली यांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. त्याग व बलिदानाची प्रतिक असलेली ही ईद मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सामूहिक नमाज अदा केल्यानंतर मौलाना यांनी देशाच्या रक्षणासाठी व संपूर्ण विश्वात सुख शांती नांदावी देशात एकता अखंडता कायम राहावे व सर्वधर्मसमभाव गुण्यागोविंदाने नांदावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली तसेच बळीराजासाठी प्रत्येक वर्ष सुखाचा व समृद्धीचा जावो पाणी पाऊस चांगला असावा यासाठी सुद्धा प्रार्थना केली नंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना बकरी ईदच्या अलिंगन देऊन एकमेकांना गळा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी धामणगाव बढे पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यासहित ईदगाह मैदानाजवळ चोख बंदोबस्त ठेवून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.प्रसंगी गावात मुस्लिम बांधवांनी इतर धर्मियांना आदाब सलाम करून गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी गावात एकतेचा शांतीचा बंधू भावाचा आभास दिसत होता एवढे मात्र खरे !