यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यात गाजत असलेल्या मंडळ अधिकारी यांच्यावर वाळु माफियाकडुन झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील एका आरोपीस अखेर पोलीसांकडून काल रात्री अटक करण्यात आले असुन ट्रॅक्टर आधीच पोलीसांनी जप्त केल्याचे वृत्त हाती आले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहीती अशी की,दि.२६ जून रोजी साकळीचे मंडळ अधिकारी सचिन जगताप हे आपल्या कर्तव्यावर असतांना ट्रॅक्टर मालक सुपडु रमेश सोळंके,ट्रॅक्टर वरील चालक आकाश अशोक कोळी आणी गोपाळ प्रल्हाद सोळुंके अवैद्यरित्या ट्रॅक्टरवर गौण खनिज वाळुची वाहतुक करून ट्रॅक्टरमधील वाळु खाली करीत असतांना महसुल पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला तसेच ट्रॅक्टर ताब्यात घेवुन यावलकडे येत असतांना यावेळी कर्तव्यावर असलेले सचिन जगताप यांच्यावर वरील तिघांनी मिळुन मारहाण करीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी यावल तालुका तलाठी संघ व महसुल कर्मचारी यांनी रजा आंदोलन सुरू केले आहे.या घटनेतील वाळु वाहतुकीचे ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असुन गुह्यातील संशयीत आरोपी गोपाळ प्रल्हाद सोळुंके वय २८ वर्ष राहणार कोळव्हावी तालुका यावल यास दि.३० जुन शुक्रवार रोजी १o वाजेच्या सुमारास कोळन्हावी या ठीकाणाहुन अटक करण्यात आली आहे.सदरहू गोपाळ प्रल्हाद सोळुंके याच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व पोलीस करीत आहे.