Just another WordPress site

पाडळसा येथील अवैध दारूअड्डे बंद करण्याबाबत जनक्रांती मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील पाडळसे गावात असलेले बेकायदेशीर अवैध दारूअड्डे हे बेसुमारपणे चालू असून या दारू अड्ड्यांमुळे गोरगरीब कुटूंबाचे प्रमुख दारूच्या व्यसनाला बळी पडुन अनेक गरीब कष्टकरी महिलांचे संसार उध्वस्त होत आहे तरी येथील अवैध दारू अड्डे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी जनक्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे.

याबाबत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,फैज़पुर पोलिस स्टेशनला अनेक वेळा दारूअड्डे बंद करणेबाबत तक्रारी केलेल्या असून सुद्धा सुमारे १५ ते २० दारूअड्डे सर्रासपणे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे.गेल्या ८-१० दिवसांपूर्वी गावातील २७ वर्षाचा तुषार तावडे नावाचा युवक विषारी दारूच्या सेवनामुळे दुदैवीरित्या मरण पावला या सन्दर्भात पोलिसांनी सखोल चौकशी करावी व दारूचे व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी व कायमस्वरूपी दारू अड्डे बंद करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे तीव्र निदर्शने करुन उपजिल्हाधिकारी संजय भारदे व अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन सादर करण्यात आले.सदरील आंदोलन जनक्रांती मोर्चाचे राज्य अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचे नेतृत्वात करण्यात आले.यावेळी जनक्रांति मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तायडे,जिल्हा अध्यक्ष साहेबराव वानखेडे,संग्राम कोळी,सूरज कोळी,तुषार भोई,समाधान कोळी,किरण तायडे,कल्पेश कोळी,कुंदन कोळी,विशाल सपकाळे,धनराज कोळी,मयूर कोळी,सय्यद टकारी,अतुल कोळी,दशरथ कोळी,मनोज पाटील, सुनील कोळी,योगेश कोळी,बबलू कोळी,कुंदन कोळी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.