यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
प्रदेश काँग्रेस पक्षाचे आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सुचनेनुसार यावल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मंडळ कमिटीची रचना,
ग्रामस्तरीय काँग्रेस कमिटया व प्रभाग कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक तालुक्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत असून यात तालुकावासीयांचा मोठा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,आमदार शिरीषदादा चौधरी,माजी खासदार डॉ.उल्हास पाटील,माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्तरीय काँग्रेस कमेटी व मंडळ स्तरीय कमेटी तसेच बुथ कमेटी तयार करणे संदर्भात तालुका भर दोरे निश्चित करण्यात आले आहेत.त्या अनुषंगाने काल दि.४ जुलै रोजी सकाळच्या सत्रात भालोद पाडळसा जि.प गटातील पडाळसा गणातील अकलुद,दुसखेडा,कासवा,कठोरा या गावात तर दुपारच्या सत्रात वडोदे प्र सावदा, रिधुरी,करंजी,वनोली,कोसगाव,पाडळसा या गावात सदर अभियान राबविण्यात आले.यावेळी गावातील कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला प्रामुख्याने तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले.सदर अभियानात प.स.गटनेते शेखरबापू पाटील,प्रदेश सरचिटणीस जलील पटेल, मा.प,स.सदस्य धनुभाऊ ब्रहाटे,डॉ.इंगळे यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.