Just another WordPress site

स्तुत्य उपक्रम : युवा स्वाभिमान पार्टीतर्फे ४३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गोपाल शर्मा,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

येथील स्थानिक सांस्कृतिक भवन येथे शहरातील १० वी व १२ वी तसेच स्पर्धा परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या ४३२२ विद्यार्थ्यांचा आमदार रवीभाऊ राणा व खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते पालक व गुरुजनांसह भव्य सत्कार नुकताच करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला समृध्दी महामार्गावर दुर्दैवी अपघाती निधन झालेल्या २५ नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत रवी राणा यांच्या वतीने दुःख व्यक्त करुन आपल्या संवेदना व्यक्त करण्यात आल्या.तदनंतर शहरातील १० वी व १२ वी तसेच स्पर्धा परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या ४३२२ विद्यार्थ्यांना शालेय बॅग, स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देवून आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.प्रत्येक विद्यार्थ्याला सदरील सन्मान प्रसंगाचे छायाचित्र भेट स्वरूपात देण्यात येणार हे विशेष !

प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून खूप मोठे व्हा पण आपली संस्कृती व आपल्या परंपरा विसरू नका असे आवाहन करून खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतील तरुण तरुणींना रोजगार मिळावा,शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा व अमरावती जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जिल्ह्याला दहा हजार करोड रुपयांचा मेगा टेक्सटाइल पार्क मंजूर केल्याबद्दल आभार मानले तसेच चिखलदरा स्काय वॉक लवकरच सुरू होवून पर्यटन विषयक विकास होईल.त्याचबरोबर बेलोरा विमानतळ लवकरच सुरू होवून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळेल असे अभिवचन खासदार नवनीत राणा यांनी यावेळी दिले.यावेळी २०० गुणवंत विद्यार्थ्यांना खासदार नवनीत राणा स्वखर्चाने दिल्ली येथे नवीन संसद भवन,राष्ट्रपती भवन आदी दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट करवून देणार ही घोषणा होताच विद्यार्थी व पालकांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत केले.
तर आमदार रवी राणा यांनी आजचे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य असून मेहनत संघर्ष व आत्मविश्वास हीच यशाची शिदोरी असल्याचे सांगितले.अमरावती मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सहकार्य केल्याबददल आमदार रवी राणा यांनी आभार मानले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारून जिल्हावासियांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला.गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सतत मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य असून आपण कटिबध्द असल्याचे आमदार रवी राणा यांनी यावेळी नमूद केले.यावर्षीपासून अमरावती जिल्ह्यातील धारनी,चिखलदरा,अंजनगाव सूर्जी,दर्यापूर,तिवसा,भातकुली,चांदूर बाजार आदी तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार होणार असल्याची घोषणा आमदार रवी राणा यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितु दुधाने यांनी केले तर सूत्रसंचालन नाना आम्ले व मिलिंद कहाळे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन नितीन बोरकर यांनी केले.यावेळी मंचावर युवा स्वाभिमान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे,मार्गदर्शक चंद्रकुमार जाजोदीया,शैलेंद्र कस्तुरे,जयंतराव वानखेडे,मालानी काका,संजय हिंगास्पुरे,जितु दुधाने,सुखदेव तरडेजा,सुमती ढोके,ज्योती सैरीसे,प्रा.अजय गाडे,विनोद जायलवाल,धीरज केणे,नितीन बोरकर,देवानंद राठोड,उमेश डकरे,विलास वाडेकर,बबन रडके आदी उपस्थित होते.तर
कार्यक्रम यशस्वितेसाठी सुनीलभाऊ राणा यांच्या मार्गदर्शनात प्रा.अजय मोरया,आशिष गावंडे,सचिन भेंडे,अविनाश काळे,विनोद गुहे,पराग चीमोटे,चंदू जावरे,अजय जयस्वाल,आशिष कावरे,प्रवीण सावळे,संदीप गुल्हाने,अनुप अग्रवाल,मंगेश चव्हाण,निलेश भेंडे,अनुप खडसे,सचिन बोंडे,खुशाल गोंडाने,रवी गवई,जयश्री मोरया,सुनीता सावरकर,अर्चना तालन,नंदा सावदे,वंदना जामनेकर,वर्षा पकडे,समीक्षा गोटेफोडे,सिंधू मतलाने,माला खरसुडे,शालिनी देवरे,मिरा कोलटेके,प्रधान ताई,मंगला जाधव,पल्लवी गोस्वामी,अजबे ताई,निता तिवारी,सीमा लवणकर,प्रिती देशपांडे,साक्षी उमक,लताजी अंबुलकर,दीपक जलतारे,नितीन म्हस्के,राजेश दातखोरे,मनोज ढवळे,आनंद भोयर,शहजाद भाई,गौरव खोडकर,आतिश इंगळे,संकेत गादे,ललित वानखडे,अमन जोशी,धनंजय लोणारे,विकी बिसने,नीरज गवई,अर्जुन दाते,शुभम उंबरकर,राहुल काळे,मंगेश कोकाटे,सचिन सोनोने,राजेश सुंडे,अनुराग बोरकर,वैभव गोस्वामी,लकी पिवाल यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.