Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात गट पडलेलेच नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत व हा पक्ष शरद पवारांचाच आहे.आम्ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारे असू किंवा राज्यात काम करणारे सगळेच शरद पवार यांच्या अखत्यारीत काम करतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गट पडण्याचा प्रश्नच येत नाही असे आता सोनिया दुहान यांनी म्हटले आहे.सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत त्यांनी माध्यमांशी चर्चा करताना ही प्रतिक्रिया दिली आहे.सोनिया दुहान या त्याच रणरागिणी आहेत ज्यांनी २०१९ ला जेव्हा अजित पवारांचे बंड झाले तेव्हा ते मोडून काढण्यात आणि आमदारांना परत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.२०१९ ला शरद पवारांनी जे चेकमेट दिले ती त्यांची ताकद होती.मी त्यांच्या सांगण्यावरुनच सगळ्या गोष्टी तेव्हा केल्या होत्या.शरद पवार यांच्या आयुष्यात अशी अनेक वादळे आली आहेत त्यांनी त्यावर सहज मात केली आहे या संकटावरही ते मात करतील.अजित पवार यांनी त्यांची चाल खेळली आहे परंतु आमचा डाव अद्याप बाकी आहे असेही सोनिया दुहान यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे अजित पवार यांनी पक्षावर दावा सांगितला आहे.पक्ष आणि चिन्ह तसेच बहुतांश आमदार हे आमच्याचकडे आहेत असे अजित पवार यांनी म्हटले आहे त्यावर सोनिया दुहान म्हणाल्या की,मला एक साधी गोष्ट सांगा की माझ्याकडे नंबर्स आहेत तर मी नंबर घेऊन स्टेटमेंट करत बसेन की त्या लोकांना समोर आणेन.एक लक्षात घ्या हत्तीचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे.जे तुम्हाला दाखवले जात आहे त्याला भुलू नका.वास्तव काय आहे ते स्वीकारा असेही सोनिया दुहान यांनी स्पष्ट केले आहे.