मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
माझ्या विचारांची बांधिलकी तोडली आणि आता माझ्याशी वैचारिक मतभेद आहेत त्यांनी यापुढे माझे छायाचित्र वापरू नये असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटासाठी मंत्रालयासमोरील ‘प्रतापगड’ हा शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे.खासदार प्रफुल पटेल,अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,मंत्री छगन भुजबळ आदी पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या उपस्थित या नवीन कार्यालायाचे उद्धाटन करण्यात आले यावेळी शरद पवार यांचे छायाचित्र येथे लावण्यात आले होते याबाबत पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
ज्या लोकांनी पक्षाच्या विचारधारेच्या परस्पर विरोधी भूमिका असलेल्या राजकिय पक्षासोबत युती केली असून हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात आहे त्यामुळे मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना माझ्या परवानगीशिवाय द्रोह करणाऱ्यांनी माझे छायाचित्र वापरू नये असा इशारा पवार यांनी दिला आहे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील कार्यालयात पवार मंगळवारी दुपारी उपस्थित होते.या ठिकाणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,बाळासाहेब थोरात,विश्वजित कदम,नसीमखान,यशोमती ठाकून या कॉंग्रेसच्या नेत्यांनी पवार यांची भेट घेतली.अजित पवार आणि इतर आठ सहकारी यांच्याबंडानंतर आम्ही पवार यांना भेटण्यासाठी आलो होतो.महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी यावेळी चर्चा झाली.लवकरच राज्यात मविआच्या सभांचे आयोजन करण्यात येणार असून राज्यात सत्ताधारी भाजपविरोधात एकजूट राखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले आहे.