चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल तसेच पंकज विद्यालय या दोन्ही शाळांच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काल दि.५ जुलै बुधवार रोजी ‘करिअरवर बोलू काही’ या विषयावर जिल्हा बालकल्याण समिती सदस्य संदिप पाटील यांचा दोन दिवसीय मार्गदर्शन शिबीराचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जिल्हा बालकल्याण समिती सदस्य संदिप पाटील यांनी करिअरची निवड कशी करावी? व करिअर म्हणजे नेमके काय? तसेच आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचा आहे असे अनेक क्षेत्राची ओळख विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाच्या माध्यमातुन करून दिली त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध करिअरचे क्षेत्र निवडण्यासाठी दहावीनंतर नेमके काय नियोजन व अभ्यासाची तयारी,कोण कोणत्या एंट्रन्स म्हणजेच प्रवेश परीक्षा,विविध क्षेत्रात जाण्यासाठीची आवड आणि शैक्षणिक गुणवत्ता काय असावी लागते या संदर्भातली संपूर्ण माहिती मुलांना या सत्रात दिली. पीपीटी सादरीकरणात मुलांना दृकश्राव्य माध्यमातून सर्व सखोल माहीती मार्गदर्शनाद्वारे देण्यात आली.या सत्राच्या शेवटी ओपन सेशन ठेवण्यात आले याला सुद्धा विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.या सत्रात विद्यार्थीनींच्या अनेक अडचणी व त्यांच्या मनातील समस्या व अनेक प्रश्न विचारले आणि त्या माध्यमातून मुली,मुलांच्या (विद्यार्थ्यांच्या ) मनातील शंकाचे व प्रश्नांचे निराकरण डांभुर्णी तालुका यावल येथील रहिवाशी व जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य संदीप निंबाजी पाटील (सोनवणे) यांनी करून दिले.या दोन दिवसीय मार्गदर्शन शिबीरात स्कुलच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी मोठया संख्येत आपला सहभाग नोंदविला.या प्रसंगी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिलिंद पाटील तसेच पंकज विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.