मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून लांबला होता तर जूनचे तीन आठवडे कोरडे गेल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पाऊस दाखल झाला मात्र वेळेआधीच मॉन्सूनने देश व्यापला आहे.मधल्या काळात काही वेळ विश्रांती घेऊन पाऊस आता पुन्हा सक्रिय झाला आहे दरम्यान पुढील ३ ते ४ दिवस राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी काल ५ जुलै रोजी ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली असून पुढील चार ते पास दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज विचारात घेऊनच कामाचे नियोजन करावे असे त्यांनी म्हटले आहे.
पुणे,सातारा,कोल्हापूर,बुलढाणा,वाशिम,यवतमाळ,नाशिक,जळगाव,पालघर,ठाणे,वर्धा,यवतमाळ,नागपूर,गोंदिया या भागातही येत्या काळात पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.