Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता.निवृत्त व्हायचे एक वय असते.सरकारी कर्मचारी ५८ व्या वर्षी निवृत्त होतात.भाजपात निवृत्त व्हायचे वय ७५ च्या पुढचे आहे.अशात ८२,८३ वय झाले तरीही आमचे वरिष्ठ थांबत का नाही?असा प्रश्न अजित पवार यांनी केला होता तसेच अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे.अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह ‘घड्याळ’ पक्षचिन्हावर आपला दावा ठोकला आहे तसेच ३० जून रोजीच आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष झालो आहे अशा आशयाचे पत्र अजित पवार गटाकडून भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहे यामुळे दोन्ही गटातील वादाला ठिणगी पडली आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा अध्यक्ष कोण? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.त्यावर आता शरद पवारांनी जोरदार उत्तर दिले आहे.दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे उत्तर दिले आहे.मी कुठेही थांबण्याचा प्रश्नच येत नाही.मी आता आणखी जोमाने काम करणार आहे.वय ८२ होऊ द्या किंवा ९२ होऊ द्या असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना उत्तर दिले आहे.मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. दुसऱ्या कुणी काय म्हटले? त्याला काही अर्थ नाही.कोण काय म्हणतय त्याच्याशी मला काही करायचे नाही.आजही जी कार्यकारिणी झाली ती माझ्या अध्यक्षतेखाली झाली असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
यावर आता स्वत: शरद पवारांनी उत्तर दिले आहे.अजित पवारांची अध्यक्ष पदावर झालेल्या कथित नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले,कुणी काय केले ते मला माहीत नाही पण एक गोष्ट पक्की आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष मीच आहे दुसरे कुणी स्वत:च्या नावाने विधान केले असेल किंवा काही बोलले असेल तर ते तसे बोलू शकता याला काहीही महत्त्व नाही यामध्ये काहीही तथ्य नाही.खरे तर आज शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलावली होती या बैठकीला राष्ट्रीय स्तरावरील काही नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकमताने शरद पवारांना पाठिंबा दिला आहे.या बैठकीत अजित पवारांसह ९ आमदारांना आणि दोन खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.यावेळी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत दोन खासदार आणि नऊ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे यातील दोन खासदारांमध्ये प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे याशिवाय एस.आर.कोलहली यांचेही निलंबन करण्यात आले असून या बैठकीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीने एकूण ८ ठराव मंजूर केले आहे.बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले,एक गोष्ट खरी आहे की २०१९ मध्ये काही लोकांनी त्यांच्या सह्यांचे एक पत्र दिले होते त्यात पक्षाचे पुढील धोरण काय असावे कुणाबरोबर युती करावी यावर चर्चा करण्याची गरज आहे असे म्हटले त्यावर मी बैठक बोलवावी असे म्हटले होते मात्र नंतर पुढे निवडणूक आली आणि त्यावर काहीही चर्चा झाली नाही.मला पूर्ण विश्वास आहे की २०१४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल व आज जे सत्तेत आहेत त्यांना लोक दूर करतील.राज्यातील विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.जे महाराष्ट्रात सुरू आहे त्याबाबत मला आनंद आहे की याची मोठी किंमत मतदारांना आश्वासन देऊन चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना मोजावी लागेल.राज्यातील सत्तेत बदल होतील आणि जनता राष्ट्रवादी,काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या हातात सत्ता देतील असेही शरद पवारांनी नमूद केले आहे.