Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महाराष्ट्राचे राजकारण हे २०१९ पासून विविध प्रकारच्या अशक्य वाटणाऱ्या वळणांवर जाताना आपण सगळ्यांनीच पाहिले असून २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी त्यानंतर अशक्य वाटणारे काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार त्यानंतर एकनाथ शिंदेंचे बंड आणि परवा झालेले अजित पवारांचे बंड या सगळ्या गोष्टी एकीकडे घडत असताना भाजपात फूट पडणार का? अशी चर्चा नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे सुरु झाली आहे.पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक सूचक वक्तव्य केले आहे.नाना पटोले यांनी भाजपावर हा आरोप केला आहे की भाजपाने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या वेळीच एक वातावरण निर्माण केले होते तसेच भाजपाचे लोक बेताल वक्तव्य करत होते.काँग्रेसचे लोक पक्षाची साथ सोडतील असे सांगितले जात होते.आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर पुन्हा एकदा काँग्रेसही फुटणार अशी चर्चा सुरु झाली आहे मात्र आमचे कुठलेही नेते सोडून जाणार नाहीत आणि ते वेगळा विचार करणार नाहीत असे नाना पटोलेंनी सांगितले आहे.महागाई,बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन विचिलित करण्यासाठी भाजपाकडून असे काही दावे केले जातात.काँग्रेसची बदनामी सुरु आहे.भाजपाने घरे फोडण्याचेच काम आत्तापर्यंत केले आहे असेही नाना पटोले म्हणाले.
त्याचवेळी त्यांना पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर आहेत आणि त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्याची चर्चा आहे यावर प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले,पंकजा मुंडे या जर काँग्रेसमध्ये आल्या तर आम्ही त्यांचे स्वागतच करु.सोनिया गांधींशी त्यांची याबाबत चर्चा झाली असेल तर चांगली गोष्ट आहे असे सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे मात्र सोनिया गांधी यांची पंकजा मुंडेंची भेट झाली का? याविषयी काही माहित नाही असेही त्यांनी म्हटले आहे पण पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये आल्या तर आम्ही त्यांचे स्वागतच करु असे नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना फोडले जात आहे.भ्रष्टाचार हा भाजपचा डीएनए आहे.भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात आहे,विचारात आहेत.भ्रष्टाचार वाढवणे,भ्रष्टाचार करणाऱ्याला पाठीशी घालणे हे भाजपा करत आला आहे.कर्नाटकाच्या निवडणुकीत वेगळे काय घडले? पण कर्नाटकाच्या लोकांनी त्यांना जागा दाखवली अशी टीकाही त्यांनी केली आहे.