गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत व पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचे बोलले जात होते या सर्व चर्चा पंकजा मुंडे यांनी फेटाळल्या असून मी कधीही काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्रत्यक्षपणे भेटले किंवा पाहिले नाही असे सांगत पंकजा मुंडे यांनी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.त्या वरळीत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.पंकजा मुंडे म्हणाल्या की,२०१९ साली मी भाजपाची उमेदवारी होती तेव्हा माझा पराभव झाला माझ्या पराभवानंतर भाजपात अनेक निर्णय झाले त्या निर्णयात मी सामील झाले नसल्याने आणि तिकीट नाकारल्याने पक्षातून बाहेर जाणार अशा चर्चा रंगल्या परंतु दसरा मेळावा,३ जून आणि १२ डिसेंबरला मी माझी भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे व सातत्याने माझी भूमिका मांडणे माझ्या नैतिकतेवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे त्यामुळे मी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आले नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ‘पंकजा मुंडे आमच्याकडे आल्या तर चांगले आहे अशी विधाने केली या गोष्टीला मी हलक्यात घेतले असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
अलीकडे आलेल्या एका बातमीने मला अंर्तमुख केले असून त्यात मी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची दोनदा भेट घेतली आणि मी काँग्रेसच्या वाटेवर आहे असे सांगण्यात आले.मी कधीही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्रत्यक्षपणे भेटले किंवा पाहिले नाही.कोणत्याही बातमीवर प्रश्नचिन्ह टाकून कायदेशीर प्रश्न सोडवू शकता परंतु प्रसारमाध्यमांनी कोणतीही बातमी देताना स्त्रोत देण्याची आवश्यकता आहे त्यामुळे या माध्यमांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहे त्यांनी केलेल्या कथनाचे पुरावे न्यायालयात सादर करावे लागतील माझे करियर कवडीमोलाचे नाही असेही पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.