जन्मत:च दोन्ही हातांनी अपंग असलेल्या गणेशचे आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न मुख्यमंत्र्यांच्या माणुसकीतून पूर्ण होणार !!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणुसकीचे दर्शन महाराष्ट्राला पुन्हा एकदा झाले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता एका नऊ वर्षांच्या चिमुकल्याची जबाबदारी घेतली असून नऊ वर्षांच्या या चिमुकल्याचे नाव गणेश आहे.तो पायांच्या बोटांनी लिहितो कारण त्याला जन्मतः दोन्ही हात नाहीत परंतु त्याचे स्वप्न आहे सैनात जाण्याचे ते पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.लवकरच गणेश या नऊ वर्षांच्या चिमुकल्याला कृत्रिम हात बसवण्यात येणार आहेत.नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणारा गणेश माळी वय-९ वर्ष हा इयत्ता ३ री मध्ये शिकतो आहे त्याला जन्मापासूनच दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या कोवळ्या वयातही त्याचे शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्याचा अपंगत्व थांबू शकले नाही.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समोर गणेशने पायाने आपले पूर्ण नाव लिहून दाखवले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले व त्यांनी या मुलाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगत मदतीचा हात पुढे करून माणुसकीचे दर्शन घडवून आणले.त्यांच्या या निर्णयाचे राज्यभरातून कौतुक करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी गणेशला अपंगत्व आहे त्याला मदत करा अशी मागणी त्याचे वडिलांनी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे केली होती परंतु सदर आजार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बसत नसल्याने मंगेश चिवटे यांनी राज्याचे संवेनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घालून दिली.मुख्यामंत्र्यांनी लगेचच गणेशची संपूर्ण जबाबदारी घेऊन पहिल्या टप्प्यामध्ये ५ लक्ष रूपयाचा धनादेश त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द केला आहे तसेच लवकरच त्याला कृत्रिम हात बसवून देण्याचे आश्वासनही मुख्यामंत्र्यांच्या वतीने देण्यात आले आहे.यावेळी गणेशला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ‘मोठे झाल्यावर तुला काय व्हायचे आहे?’ असा प्रश्न विचारला असता गणेशने “मला मोठे झाल्यावर आर्मीमध्ये भरती व्हायचे आहे आणि शत्रूवर गोळ्या झाडायच्या आहेत”असे उत्तर दिले.प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशचे आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा शब्द दिला आहे.