यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधत शहरातील विविध शाळेतील होतकरू गरिब शाळकरी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
यानिमित्ताने यावलचे माजी नगरसेवक विजय गजरे यांच्या वतीने भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधुन येथील तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात नगर परिषद यावलव्दारे संचलीत साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सरस्वती विद्या मंदिर यावल,शशिकांत सखाराम चौधरी विद्यालय यावल मधील इयत्ता ५ वी ते ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दलित,शोषित,वंचित,आर्थिक दुर्बल घटकातील गोरगरीब गरजु विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्नय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन मसाकाचे चेअरमन शरद महाजन, भगतसिंग पाटील,पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विश्र्वनाथ धनके,सेवानिवृत्त शिक्षक पी.एस.सोनवणे,डॉ.युवराज चौधरी,साने गुरुजी माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील,सेवानिवृत्त शिक्षक एस.के.बाऊस्कर,अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष मोहन सोनार व विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते २०० ते २५० विद्यार्थी यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक व पालक वर्ग तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.