Just another WordPress site

जातीय तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील मोहराळे येथील एका तरूणाने आपल्या मोबाइलवर दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावतील असे स्टेटस ठेवुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणुन त्याच्या विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील मोहराळे येथील रहिवाशी नागेश्र्वर उर्फ नागो कैलास अडकमोल वय २० वर्ष या तरूणाने काल दि.७ जुलै २३ रोजी त्याच्याकडील मोबाइलवर दोन थोर पुरूषांचा अपमान होईल व दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह विधान करणारे स्टेटस ठेवुन दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.गावातील काही मुलांच्या मोबाइल हे स्टेटस गेल्याने संबधीत तरूणांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील युवराज पाटील यांच्या निर्दशनात ही बाब आणुन दिल्याने पोलीस पाटील यांनी वेळीच दखल घेत गावात दोन समाजात तेढ निर्माण होण्याआधीच पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांची भेट घेवुन त्यांना माहिती दिली.त्यानुसार मोहराळे गावाचे पोलीस पाटील युवराज जयसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून स्टेटस ठेवणारा संशयीत तरुण नागेश्वर कैलास अडकमोल याच्या विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितिन चौहाण व पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.