Just another WordPress site

उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून मिलिंद नार्वेकर यांची जागा रवी म्हात्रे घेणार?

मुंबई-
पोलीस नायक(वृत्तसेवा):-एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करत तब्बल ४० आमदार फोडले.या ऐतिहासिक बंडानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली होती.यामुळे राज्यातील राजकारणासह शिवसेनेतही मोठे बदल झाले.कित्येक वर्ष शिवसेना तसेच उद्धव ठाकरेंसोबत असलेले आमदार,खासदार एकनाथ शिंदे गटासोबत गेले.राजकीय समीकरणांसोबत शिवसेना पक्षातील अंतर्गत अनेक गोष्टीही बदलू लागल्या.सध्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंचा जवळचा व्यक्ती म्हणून एका शिवसैनिकाची मोठी चर्चा आहे.हे नाव मध्यतरीच्या काळात सक्रीय नव्हते.परंतु आता शिंदेंच्या बंडानंतर बाळासाहेबांच्या मर्जीतील असलेलं एक नाव म्हणजे रवी म्हात्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.तसेच उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या वाढलेल्या गाठीभेटीबाबत काही दिवसांपासून मोठी चर्चा आहे.२१ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला.उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मेळाव्यात मोठी गर्दी पाहायला मिळाली.या मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती रवी म्हात्रे बराच वेळा पाहायला मिळाले.मागील काही दिवसांपासून ते सक्रीय नव्हते.मात्र आता हातात फाईल घेऊन अचानक रवी म्हात्रेंची एण्ट्री झाल्याने त्यांची मोठी चर्चा होते आहे.
    रवी म्हात्रे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे खास आहेत.त्याचबरोबर बाळासाहेबांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम पहिले आहे.दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला यावेळी मेळाव्याच्या मंचावर उद्धव ठाकरेंच्या मागे रवी म्हात्रे हातात फाईल्स दिसून आली होती.शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या वर्तुळात महत्त्वाचे बदल होताना दिसत आहेत.रवी म्हात्रे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतील व्यक्तींपैकी म्हणून एक ओळखले जातात.त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असणारे मिलिंद नार्वेकर यांची जागा आता रवी म्हात्रे यांनी घेतली आहे का?अशी चर्चा सुरू आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.