ना टायर्ड हूँ,ना रिटायर्ड हूँ या अटलबिहारी वाजपेयींच्या ओळी उच्चारत शरद पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना पत्रकारांनी अजित पवार तुम्हाला रिटायर्ड व्हायला सांगत आहेत त्यावर काय सांगाल? असे विचारले असता शरद पवार यांनी हे उत्तर दिले आहे तसेच भुजबळांना आम्हीच येवलाची जागा लढवायला देऊन सेफ केले होते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.वय होते यात काही वाद नाही पण तुम्ही प्रकृती चांगली ठेवली तर वय साथ देते त्यामुळे तो काही प्रश्न नाही.मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचे वय ८४ होते ते ज्या जोमाने काम करायचे तो अनुभव थक्क करणारा होता असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.मी आज रस्त्याने येत असताना लोकांचे चेहरे त्यांचे हावभाव मी पाहिले.सामान्य लोकांच्या चेहऱ्यांमधून जो आत्मविश्वास होता त्यामुळे मला आनंद आहे.छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर आमची इच्छा होती की त्यांनी विधानसभेत आवश्यकता आहे त्यानंतर येवल्यातून त्यांनी निवडणूक लढवली.१९८६ मध्ये मी काँग्रेसमधून बाहेर पडलो वेगळा पक्ष निवडला होता तेव्हा नाशिक जिल्ह्याने आम्हाला विजयी केले होते.
माझी भूमिका मांडण्याची सुरुवात करण्यासाठी आज मी बाहेर पडलो आहे असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.मी इथे येत असतांना आम्हाला सगळ्यांना म्हणजे मी,जितेंद्र आव्हाड,अमोल कोल्हे,सुप्रिया आम्हा सगळ्यांचे लोकांनी स्वागत केले.आनंद एका गोष्टीचा आहे की वरुणराजाने स्वागत केले.नाशिक जिल्ह्यात मी आत्ताच विचारत होतो की पावसाची स्थिती काय आहे? मला हे सांगण्यात आले की रिमझिम आहे पण पुरेसा पाऊस झालेला नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.मी नाशिक निवडले ? कारण स्वातंत्र्याच्या इतिहासात नाशिकचे वेगळे महत्व आहे. तसेच काँग्रेसच्या इतिहासातही नाशिकचे वेगळे महत्त्व आहे.आणखी एक गोष्ट अशी आहे की आम्ही सगळे जण जी पिढी राजकारणात पडली त्यांचा आदर्श यशवंतराव चव्हाण होते त्यावेळी चीनचे संकट देशावर आले आणि त्यांना नेहरुंनी दिल्लीत बोलवले व त्यांना संरक्षण मंत्री केले. चव्हाण यांचा पहिला लोकसभेतला प्रवेश नाशिकमधून झाला ही नाशिकची पार्श्वभूमी आहे त्यामुळे मी इथून सुरुवात केली आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.