यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील मनवेल येथे टार्गेट मल्टिपर्पज फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने मनवेल,दगडी,थोरगव्हाण व शिरागड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरागड ग्रामपंचायत सदस्य प्रताप सोनवणे हे होते.यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद चिंचाळे यांनी संस्थेच्या माध्यमातून जळगाव जिल्हात गोरगरीब होतकरु विद्यार्थीना शिक्षणाची गोडी लागावी व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शैक्षणिक साहित्य वाटप करीत असल्याचे सांगितले.प्रसंगी ग्रा.पं.सदस्य प्रताप सोनवणे,यावल तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष व वढोदा सरपंच संदिप सोनवणे,शिरसाड येथील प्रमोद सोनवणे,गोकुळ सोनवणे,मच्छिद्र कोळी,धोडु सोळंके,उमेश सोनवणे,गणेश कोळी,रविद्र तायडे,मनवेल येथील पत्रकार गोकुळ कोळी,संदिप सोनवणे,मयुर मोरे,दिवाकर कोळी,गोकुळ कोळी,ताराचंद सोळंके सह मान्यवर उपस्थित होते.यावेळी मनवेल,दगडी,थोरगव्हाण,शिरागड येथील शिक्षण घेत असलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य मान्यवरांचा हस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रमोद चिंचाळे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार ईश्वर तागड यांनी मानले.