Just another WordPress site

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील ‘खान्देश ऑफ द इअर’ पुस्काराने सन्मानीत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

११ जुलै २३ मंगळवार

येथील राजकीय,कला,सामाजीक,शैक्षणीक व सांस्कृतीक क्षेत्रात आपल्या उल्लेखनिय कार्याचा ठसा उमटविणारे यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील यांचा जळगाव येथे कर्तव्य बहुउद्देशीय सामाजीक संस्थेच्या वतीने ‘खान्देश ऑफ द ईअर’ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

जळगाव एमआयडीसी येथील प्रसिद्ध हॉटेल सेन्टर फॉरसिजन कॉटेजच्या सभागृहात सप्तरंग मराठी चॅनल व कर्तव्य बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.९जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील यांना ‘खान्देश ऑफ द ईअर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सदरील पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणुन मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्री भार्गवी चिरमुले,जळगाव जिल्हा लायर्स ग्राहक संस्थेचे अध्यक्ष अॅड संजय राणे,सुप्रसिद्ध कॅन्सर रोगतज्ञ डॉ.निलेश चांडक,धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधनी सचिव डॉ.पी.आर.चौधरी हे होते.यावेळी मान्यवरांच्या उपस्थित विविध क्षेत्रात आपल्या उल्लेखनिय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सुमारे २७ जणांना २o२३ या वर्षाच्या ‘खान्देश ऑफ द इअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यात यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा समाजसेवक अतुल वसंत पाटिल यांना सपत्नीक या पुरस्काराने मराठी सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले.अतुल पाटील यांना देण्यात आलेल्या सन्मानाबद्दल राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते,हाजी फारूख शेख,पंचायत समिती माजी गटनेते शेखर पाटील,माजी उपनराध्यक्ष असलम शेख नबी,माजी नगरसेवक समीर शेख मोमीन,गणेश महाजन,एजाज देशमुख,एम.बी.तडवी,प्रशांत पाटील,डी.बी.पाटील,अय्युब पटेल,सुनिल गावडे,भरत कोळी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.