Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
नाशिक-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
१२ जुलै २३ बुधवार
सप्तश्रृंगी गडावरील घाट मार्गावर आज दि.१२ जुलै बुधवार रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे.या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून १५ प्रवाशी जखमी झाले आहेत.अपघातादरम्यान स्थानिकांनी धाव घेत मदत कार्यास सुरुवात केली असून आत्तापर्यंत १६ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे तर १५ जखमी प्रवाशांवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्य परिवहन महामंडळाची बुलढाणा येथील खामगाव आगाराची बस दि.११ जुलै मंगळवार रोजी सप्तश्रृंगी गडावर रात्री उशिराने आली व आज दि.१२ जुलै बुधवार रोजी सकाळी परतीच्या प्रवासाला लागली.यात घाट मार्गावरील गणपती वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बस दरीत कोसळली असून यावेळी बसमध्ये साधारणत: ३२ प्रवासी होते त्यातील १५ जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून स्थानिकांच्या मदतीने अद्याप मदत कार्य सुरू असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी दिली आहे.