Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
१२ जुलै २३ बुधवार
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर आता पक्षात दोन गट पडले असून दोन्ही गटांमधील वरिष्ठ नेते त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमदार,खासदार आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि पदे सुपूर्द करत आहेत.दरम्यान पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दि.११ जुलै मंगळवार रोजी खासदार अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती करून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याविषयीची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते अमोल कोल्हे यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रभारी खासदार सुप्रिया सुळे,कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले उपस्थित होते.
पक्षाने मोठी जबाबदारी दिल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत.अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी माझी नियुक्ती करण्यात आली.माझ्यावर हा विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो! तुम्ही सर्वांनी दाखवलेला हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन! असे नमूद केले आहे.