यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
१२ जुलै २३ बुधवार
येथील जिल्हा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी म्हणुन अरूण प्रभाकर पवार यांची नेमणुक करण्यात आली आहे.
यावल येथील एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प विभागाच्या कार्यालयात मागील चार वर्षापासुन प्रकल्प अधिकारी म्हणुन कार्यरत असलेल्या विनिता सोनवणे यांची नाशिक येथे पदोन्नतीवर बदली झाली असुन त्यांच्या जागेवर पेण जिल्हा पुणे या ठिकाणी आदीवासी विभागात सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( प्रशासन ) म्हणुन कार्यरत असलेले अरूण प्रभाकर पवार यांची पदोन्नतीवर यावल येथील जिल्हा एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे.अरुण पवार हे एक दोन दिवसात यावल येथील नेमणुकीच्या ठीकाणी हजर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदीवासी विभागाने राज्यात १० सेवा पदोन्नतीवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या बढतीवर बदलीचे आदेश दिनांक ११ जुलै २०२३ रोजी आदीवासी विभागातील कार्यासन अधिकारी महाराष्ट्र राज्य पवनकुमार बंडगर यांनी काढले आहेत.