Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
रत्नागिरी-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
राजापूर शहरातील आठवडे बाजारातील गुलमोहराचे झाड उन्मळून अंगावर पडल्याने खरेदीसाठी आलेल्या रामचंद्र बाबाजी शेळके वय ४८ वर्षे रा.बारसू,राजापूर या ग्राहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन महिला विक्रेत्या जखमी झाल्या आहेत.राजापूर शहरातील गणेश घाट परिसरात गुरुवारचा आठवडा बाजार भरला होता सकाळपासूनच राजापुरात पाऊस कोसळत होता.काल दि.१३ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आठवडे बाजारातील शौचालयालगत असलेले गुलमोहराचे झाड अचानक उन्मळून पडले व तेथे या झाडाखाली लावलेल्या दुकानात बारसू येथील रिक्षा व्यावसायिक रामचंद्र शेळके हा काही खरेदी करत होते यावेळी सदरील उन्मळून पडलेल्या झाडाच्या बुंध्याखालीच सापडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या झाडाच्या आजूबाजूला मच्छी विक्रीसाठी बसलेल्या महिलांच्याही अंगावर झाडाच्या फांद्या पडल्याने तिघी जणी जखमी झाल्या आहेत यामध्ये मुमताज आसिफ फनसोपकर वय ४८वर्षे,यास्मिन शौकत कोतवडकर वय ३५ वर्षे,सायका इरफान पावसकर वय ५५ वर्षे सर्व रा.मधीलवाडा, राजापूर या जखमी महिलांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच नगर परिषद प्रशासनाने घटनास्थळी जाऊन झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले तसेच तहसीलदार शीतल जाधव,पोलीस निरीक्षक भरत धुमाळे, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी घटनास्थळी पाहणी केली.