मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून त्यांची पहिली सभा ठाण्यात पार पडली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली असून दगाबाज कोण आणि वफादार कोण आहे हे जनतेने ठरवले आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.एवढेच नाही तर घरी बसणाऱ्या माणसाला शासन आपल्या दारी कसे कळणार? असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.सत्तेची हवा डोक्यात गेली की लोक बरोबर लक्षात ठेवतात.आपला जन्म सत्तेसाठी झालेला नाही.बाळासाहेब ठाकरे यांनी कितीतरी वेळा सत्तेला लाथ मारली आहे मात्र दुसरीकडे सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले.सत्तेसाठी बाळासाहेबांनी ज्यांना कायमचे दूर केले होते त्यांना तुम्ही जवळ केले असाही आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला.एवढेच नाही तर आम्हाला बोलायला लावू नका व बोलायला लागलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल.आमच्याकडे बोलायला बरेच आहे आणि आम्ही ते सांभाळून ठेवले आहे हे विसरु नका असा इशाराच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार बाजूला ठेवले,ज्या मतदारांनी निवडून दिले,बहुमत दिले त्यांच्याशी दगाबाजी कुणी केली? आम्हीसुद्धा बोलू शकतो.आम्हालाही बोलता येते परंतु बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची संस्कृती आणि परंपरा आहे त्यांनी काही गोष्टी शिकवल्या आहेत.आम्ही मर्यादा सोडून बोलत नाहीत याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असे मानू नका.आमच्याकडे सगळ आहे पण अजून ठेवले आहे व काढायला लागलो तर पळता भुई थोडी होईल परिणामी तोंड लपवावे लागेल असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.