Just another WordPress site

सांगवी येथील युनियन बँक शाखा व्यवस्थापकांचा ‘पोलीस नायक’तर्फे सत्कार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ जुलै २३ शुक्रवार

तालुक्यातील युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सांगवी बुद्रुक येथे  नूतन शाखा व्यवस्थापक प्रशांत कांगुणे यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याबद्दल ‘पोलीस नायक’ न्युज परिवारातर्फे आज दि.१४ जुलै शुक्रवार रोजी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत प्रशांत कांगुणे हे शाखाधिकारी म्हणून दि.५ जुलै २३ रोजी रुजू झाले आहेत.गेल्या दहा वर्षांपासून प्रशांत कांगुणे हे युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेत प्रशासकीय कार्य करीत असून याआधी त्यांनी ५ वर्षे उत्तर प्रदेश या राज्यात जबाबदारी सांभाळली.त्यानंतर धुळे जिल्ह्यातील नरडाणा शाखेमध्ये ४ वर्षाची सेवा केली असून नरडाणा येथून थेट सांगवी शाखेच्या शाखाधिकारीपदी  म्हणून त्यांनी नुकतीच जबाबदारी सांभाळली आहे.’ग्राहकांची सेवा हेच आपले कर्तव्य’ या ब्रीदावलीनुसार बँक सभासदांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येईल तसेच बँकेच्या भरभराटीकरिता सदैव तत्पर राहून काम केले जाईल अशी प्रतिक्रिया नूतन शाखाधिकारी प्रशांत कांगुणे यांनी पोलीस नायक प्रतिनिधीजवळ बोलतांना व्यक्त केली आहे.सदरहू युनियन बँकेचा नव्याने शाखाधिकारी म्हणून प्रशांत कांगुणे यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्याचे औचित्य साधून पोलीस नायक तर्फे कार्यकारी संपादक राजेंद्र आढाळे यांच्या हस्ते सत्कार करून भावी वाटचालीस नुकत्याच शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.