माझ्यापर्यंत अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही त्यामुळे नोटीसचा संपूर्ण अभ्यास करून मी यावर पुढील निर्णय घेईन- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची स्पष्टोक्ती
शिवसेनेच्या ठाकरे गटाने बंडखोर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिरंगाई न करता तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली त्यावर आज दि.१४ जुलै शुक्रवार रोजी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना नोटीस बजावत न्यायालयात दाखल प्रकरणावर दोन आठवड्यात म्हणणे मांडण्यास सांगितले आता या नोटीसबाबत राहुल नार्वेकरांना विचारले असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असून राहुल नार्वेकर म्हणाले की,मला माध्यमांमधून समजले की आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात दाखल याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
माझ्यापर्यंत अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही त्यामुळे नोटीसचा संपूर्ण अभ्यास करून मी यावर पुढील निर्णय घेईन असे मत राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे.विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी अपात्रतेबाबत शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती त्या नोटीसवर शिंदे गटाच्या आमदारांनी उत्तर दिली का? असा प्रश्न विचारला असता राहुल नार्वेकर म्हणाले की,याबाबत विधीमंडळ सचिवालयाकडून माहिती घ्यावी लागेल असे त्यांनी म्हटले आहे.