यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ जुलै २३ शनिवार
अवैद्यमार्गाने रात्रीच्या वेळी बेकायद्याशीर गौण खनिजची सुसाट वेगाने वाहतुक करणारे डंपर यावलच्या जुना चोपडा नाकाजवळ असलेल्या नायरा पॅट्रोल पंपासमोरील दुभाजावर धडकले व महसुलच्या पथकाने तडकाफडकी रात्रीच्या सुमारास कारवाई करीत जप्त करून तहसील कार्यालयात जमा केले आहे.
या संदर्भात महसुल सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या आदेशान्वये व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ जुलै शुक्रवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुसाट वेगाने वाळुची यावल किनगाव मार्गावर विनापरवाना अवैद्यरित्या गौण खनिजची वाहतुक करणारे एमएच १९ सि वाय ३४२६ या क्रमांकाचे डंपर अचानक नगर परिषदच्या दुभाजावर धडकले व सुदैवाने होणारे मोठे अपघात टळले.सदरचे वृत्त कळताच गस्तीवर असलेल्या महसुल पथकाने कारवाई करीत संबधीत डंपर पकडून जप्त केले आहे.सदरील पथकात फैजपुरचे मंडळ अधिकारी एम.एच.तडवी,भालोदचे मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांच्यासह भालोदचे तलाठी भारत सोनवणे,हिंगोणा तलाठी निलेश धांडे,डोंगर कठोरा तलाठी वसीम तडवी,यावल तलाठी ईश्वर कोळी,फैजपुर तेजस पाटील,दहिगाव तलाठी विलास नागरे,अंजाळे शरद सुर्यवंशी,अकलुद,न्हावी प्र.यावलचे तलाठी अजय महाजन यांच्यासह महसुलच्या वाहनाचे चालक अरविंद बोरसे यांनी कारवाई सहभाग घेतला.