Just another WordPress site

यावल येथील सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठाण यांची पोलीस उप निरिक्षक पदावर पदोन्नती

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ जुलै २३ शनिवार

येथील पोलीस ठाण्यात मागील दोन वर्षापासून सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत असलेले मुजफ्फर खान समशेर खान पठाण यांची पोलीस उपनिरिक्षकपदी बढती झाली असुन त्यांच्या पदोन्नतीचे स्वागत करण्यात आले आहे.

यावल हे मुळ जन्मस्थान असलेले मुजफ्फर खान पठाण यांनी आपल्या पोलिस विभागातील सेवेस १९८३ या वर्षापासून निंभोरा तालुका रावेर येथून पोलीस कर्मचारी म्हणुन सुरुवात केली.त्यानंतर गुन्हे अन्वेशण विभाग जळगाव,अमळनेर येथे शहर वाहतुक शाखा,भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाणे व यावल पोलीस स्टेशन अशा ठीकाणी सुमारे ३५ वर्षापासुन पोलीस विभागात कार्यरत आहेत.कायदा सुव्यवस्था राखण्याकामी समय सुचकता बाळगुण आपल्या कर्तव्याचे पालन करणारे पोलीस कर्मचारी म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.दरम्यान यावल येथे मागील दोन वर्षापासुन सहाय्यक फौजदार म्हणुन सेवा करीत असतांना त्यांची नुकतीच पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. या त्यांच्या पदोन्नतीबद्दल फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिक्षक डॉ.कुणाल सोनवणे,पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी,पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे,पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहीफळे व त्यांच्या सर्व सहकार्यांनी स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.