केळी विकास महामंडळाला दिवंगत नेते हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्यात येणार-ना.गुलाबराव पाटील यांची माहिती
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ जुलै २३ सोमवार
खोक्यांचे राजकारण करणाऱ्यांना करू द्या,आपला मतदार राजा हा जागृत असुन आपल्या कार्याचे उत्तर तो मतदानातुन देईल,राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या शासनाने एका वर्षात केलेले विकासकामे व जनहिताचे क्रांतीकारक निर्णय राज्यातील सर्वसामान्यापर्यंत पहोचवा असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी यावल शहरातील विविध विकास कामांचा भुमीपुजन प्रसंगी केले आहे.राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियोजीत केळी विकास महामंडळास दिवंगत कृषीमित्र हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहीतीही यावेळी ना.गुलाबराव पाटील यांनी दिली.सदरील केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी रुपयांची निधीची तरदुत देखिल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावल शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजुर झालेल्या विरारनगर,ओम नगर पासुन तर भुसावळ रोड पर्यंत,भुसावळ रोड ते आयशानगर गेट पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,शहरातील फैजपुर रोडवरील श्रीराम ऑटोपासुन तर तडवी कॉलनीपर्यंत अशा सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतील रस्ते विकास कामाचे भुमिपुजन काल दि.१६ जुलै रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.भुमिपुजन कार्यक्रमानंतर श्री.गजानन महाराज मंदीरात आयोजीत सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ना.गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,पालकमंत्र्यांचे खंदे सर्मथक व कृउबा माजी सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील,जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती रवीन्द्र उर्फ छोटु पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,डॉ.कुंदन फेगडे,कृउबा संचालक उज्जैनसिग राजपुत,भाजपा शहराध्यक्ष निलेश गडे यांच्यासह आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना भरत चौधरी यांनी केली तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार भाजपाचे विलास चौधरी यांनी मानले.