मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ जुलै २३ सोमवार
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या पाठपुराव्याने व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने मुंबई येथील हायात हॉटेल येथील कार्यक्रमात देशातील ७ पैकी एक पीएम मित्रा टेक्सटाइल पार्क अमरावतीला नुकतीच मजुरी देण्यात आली आहे.
सदरील पार्कला मंजुरी दिल्याबद्दल शुभारंभ प्रसंगी अनेक उदयोजकांनी या प्रकल्पात गुंतवणूक व करार केल्याबद्दल आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय टेक्सटाइल मंत्री पियुष गोयल,केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती दर्शना जोरदाश,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टेक्सटाइल मंत्री चंद्रकांत पाटील,उद्योग मंत्री उदय सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानण्यात आले.यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा,राज्यसभा खासदार अनिल बोंडे,श्रीमती रचना शाह सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल गवर्मेंट ऑफ इंडिया,रोहित कंसल ॲडिशनल सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल गवर्मेंट ऑफ इंडिया,हर्षदीप कांबळे प्रिन्सिपल सेक्रेटरी इंडस्ट्री अँड मायनिंग महाराष्ट्र,डॉ.विपिन शर्मा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट कमिशन,वीरेंद्र सिंग सेक्रेटरी टेक्सटाईल महाराष्ट्र इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या पाठपुराव्याची प्रशंसा केली.