Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जुलै २३ सोमवार
अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी २ जुलै रोजी वेगळी वाट धरल्यापासून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून नुकतेच या सर्वांना खातेवाटपही जाहीर झाले आहे मात्र अद्याप अजित पवारांबरोबर गेलेले आमदार कोणते व त्यांचा आकडा नेमका किती? याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तसेच खुद्द अजित पवार गटाने यासंदर्भात फक्त ‘बहुसंख्य आमदार आमच्या बाजूने’ असा दावा केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून आता पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने चित्र स्पष्ट होणार आहे.महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज दि.१७ जुलै सोमवार पासून सुरुवात होत आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी व विरोधकांमद्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप व निरनिराळ्या दावे प्रतिदाव्यांचे राजकारण रंगले या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पक्षप्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विरोधी बाकांवर बसण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून अनिल पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद म्हणून पक्षातील आमदारांना व्हीप जारी केला आहे त्यामुळे आता कोणते आमदार कुठे बसणार आणि कुणाला कुणाचा व्हीप लागू होणार? हा वाद पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे.
जवळपास वर्षभरापूर्वी शिवसेनेतील फुटीनंतरही असाच वाद महाराष्ट्राने अनुभवला असून आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात मोठ्या फुटीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तोच वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.शरद पवार गटाने अजित पवारांसह शपथ घेतलेल्या एकूण ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे त्यामुळे साहजिकच हे ९ आमदार वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर ४४ आमदारांना उद्देशून जितेंद्र आव्हाडांनी हा व्हीप जारी केला आहे आता त्यातले किती विरोधी बाकांवर बसणार आणि किती सत्ताधारी बाकांवर जाणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.दरम्यान अद्याप विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात निर्णय न घेतल्यामुळे तसेच राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणता? यासंदर्भात पक्षफुटीनंतर संभ्रम निर्माण झाल्यामुळे कुणाचा व्हीप कोणत्या आमदारांना लागू असेल? याबाबत पुरेशी स्पष्टता आलेली नाही त्यामुळे आता पुन्हा एका नव्या गुंतागुंतीच्या प्रकरणाची ही सुरुवात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.