Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जुलै २३ सोमवार
सांगलीतील पथकर नाक्याजवळ एसटी बस रस्त्याकडेच्या शेडवर आदळल्याने झालेल्या अपघातात १६ प्रवासी जखमी झाले असून आज दि.१७ जुलै सोमवारी दुपारी अपघात झालेली बस कराड तालुक्यातील नाईकबा तीर्थस्थानाहून सांगलीकडे येत होती.सांगली आगाराची बस एमएच ४० एन ९५०३ नाईकबाहून परत येत होती.बस सांगलीवाडी नजीक टोलनाक्यावर आल्यानंतर बैलगाडी सांगलीकडे येत होती यावेळी बैलगाडीच्या पुढे जाण्यासाठी बस चालकांने डावीकडील बाजूने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला यादरम्यान रस्त्याकडेला असलेल्या काळ्या मातीच्या चिखलात बसची चाके घसरून रस्त्याकडेला पथकर आकारणीसाठी उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवजा कार्यालयात ती घुसली व हा अपघात झाला.