रहाटगाव ते अमरावती महामार्गाच्या काँक्रीट रस्ता बांधकामासाठी २५ कोटींचा निधी मंजूर
आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी मानले उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांचे आभार
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
अमरावती शहराच्या लगतच्या परिसरात वाढते शहरीकरण लक्षात घेता सुरक्षित अवागमन,प्रवासी वाहतूक व दळण वळणाच्या सोयीसाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्वक काँक्रीट रस्त्यांची निर्मिती करण्याकरीता अमरावतीच्या आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु केला आहे व याची फलश्रुती म्हणून अमरावती शहरातील प्रमुख मार्ग,राज्य मार्ग तसेच लहान मोठे रस्ते,अंतर्गत रस्ते हे कात टाकत असून सर्वत्र काँक्रिट रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे पसरले आहे यात आता आणखीन एका नव्या उपलब्धीची भर पडली आहे.पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये अमरावती विधानसभा मतदार संघातील रहाटगावपासून ते अमरावती महामार्ग पर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरण व बांधकामासाठी २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.याबद्दल आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार मानून अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काल दि.१७ जुलै पासून सुरुवात झाली असून १४ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजानिमित्ताने अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी विधिमंडळ हजेरी लावली. या अधिवेशनात अनेक विधेयके व प्रस्तांवार चर्चा करण्यात येऊन पुरवणी बजेटमध्ये निधीला घेऊन तरतूद देखील करण्यात आली.अमरावती विधानसभा मतदार संघात शिक्षण,आरोग्य सुविधा,उद्योग,परिवहन,महिला विकास,पायाभूत सुविधा यासह विविध विकास कामांच्या उपलब्धतेसाठी आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी आग्रही भूमिका घेतल्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये रहाटगांवापासून ते अमरावती महामार्ग पर्यंतच्या काँक्रीट रस्ता बांधकामासाठी २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आगामी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता हा रस्त्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बहूपर्यायी ठरणार आहे तसेच शाळा महाविद्यालयात येण्यारे विद्यार्थी,शेतकरी बांधव,दूध विक्रेते,पशु पालक यांना सुद्धा या मार्गावरून चांगली सुविधा मिळणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी नेहमीच अमरावतीच्या विकासासाठी भरभरून निधी उपलब्ध करून दिला आहे.आता पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रहाटगांव ते अमरावती द्रुतगती महामार्गाच्या काँक्रीट बांधकामासाठी २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याने आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार मानून अभिनंदन केले आहे.