Just another WordPress site

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ (INDIA) जाहीर

बंगळुरू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१८ जुलै २३ मंगळवार

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला नमवण्यासाठी देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असून या पक्षांची संयुक्त बैठक आज दि.१८ जुलै मंगळवार रोजी बंगळुरू येथे पार पडली.देशभरातील २६ पक्ष या बैठकीला हजर होते व या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत.लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या फॉर्म्युलासह या पक्षाच्या आघाडीला नाव ठरवण्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आघाडीचे नाव जाहीर केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ (INDIA) असे नाव देण्यात आले असून India या संक्षिप्त रुपाचा पूर्ण अर्थ Indian National Development Inclusive Alliance असा होतो.विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा येथे आयोजित करण्यात आली होती.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती त्यावेळी पुढची बैठक जुलै महिन्यात होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते त्यानुसार काल सायंकाळपासून २६ पक्षातील नेते एकत्र आले आहेत यामध्ये महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि शरद पवारही सहभागी झाले.दरम्यान या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटप,आघाडीचे नाव आणि आघाडीचं निमंत्रक ठरवण्यात येणार असल्याचे ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल दि.१७ जुलै रोजी सांगितले होते त्यानुसार आजच्या बैठकीत हे नाव ठरवले असल्याचे म्हटले गेले  आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की,विरोधकांची पहिली बैठक पाटणा येथे पार पडली त्यानंतर आज दुसरी बैठक बंगळुरूत होत आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ची पुढची बैठक महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे होईल.आम्ही आता २६ पक्ष एकत्र आलो आहोत.आधीच्या बैठकीत २० पक्ष आले होते.पाटणा येथे येण काही पक्षाच्या नेत्यांना शक्य झाले नव्हते त्यामुळे तेव्हा तिथे तुम्हाला कमी पक्ष दिसले परंतु आता आम्ही २६ पक्ष एकत्र आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाचे धाबे दणाणले आहेत.आमची ही बैठक पाहून त्यांनी ३० पक्षांची बैठक बोलावली आहे.मल्लिकार्जुन खरगे म्हणाले,आमची २६ पक्षांची एकजूट पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएची बैठक बोलावली आहे यात त्यांनी ३० पक्षांना बोलावले आहे हे ३० पक्ष कुठले आहेत तेच माहिती नाही त्यांनी कोणाला बोलावले आहे ते माहिती नाही व हे पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत की नाही तेसुद्धा कोणाला माहिती नाही.या पक्षांची नावही कधी ऐकली नाहीत ज्यांच्याशी मोदी याआधी कधी बोलत नव्हते त्यांनाही बैठकीसाठी बोलावले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.