अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथील शेतकरी वर्गाचे सार्वजनिक बांधकाम मंडळच्या हलगर्जीपणामुळे धामक ते येवती रोड लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी असल्यामुळे शेतीचे मागिल पाच ते सात वर्षीपासून लाखो करोडो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग बडनेरा यांचेकडे वारंवार तक्रारी करून व फोनवरुन सुध्दा अधिकारी यांना याबाबत माहिती देण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षच करण्यात येत आहे.त्याचबरोबर रोड लगत असलेल्या नाली बुजण्यात आलेल्या असल्यामुळे नालीमधुन वाहणारे पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतातुन जात आहेत परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकरी हतबल होत आहेत.आधीच बँकेचे कर्ज तसेच उधारीमध्ये आणलेले बियाणे व खत यांचा खर्च काढायचा कुठुन हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना भरीव अर्थसहाय्य उपलब्ध करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन करण्यात आली आहे.
सदरील शेतकऱ्यांचे नुकसान हे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे हलगर्जीपणामुळे नुकसान होत असून रोड लगत असलेली नाली पुर्णपणे बुजलेली असल्याने हे पाणी जाण्यासाठी रोड क्रॉस करुन मोठा पुल बांधकाम करणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुडुंब भरणार नाही.मागील काही वर्षांपासून अशाच प्रकारे नुकसान होत असल्याने सुमारे अदांजे १०० ते १५० एकर शेतजमीन हि पाण्याखाली राहात असल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी वजा तक्रार येवती येथील शेतकरी राजेश फुलुके यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे.तसेच कापसे यांच्या शेताजवळ मोठा पुल बांधकाम करणे गरजेचे असल्याने पुल बांधकाममुळे शेतकरी वर्गाची हि समस्या सुटून शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येणार असल्याचे मत धामक येथील शेतकरी हरेशलाल जयस्वाल यांनी व्यक्त केले आहे.तर सार्वजनिक बांधकाम विभाग बडनेरा यांच्या गलथान कारभारामुळे रोडच्या दोन्ही साईडने नाल्यांनाही काढल्यामुळे रोडचे संपूर्ण पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्यामुळे शंभर ते दोनशे एकर शेती पाण्याखाली बुडली आहे तसेच याबाबत आम्ही पाच ते दहा वर्षापासून अनेक वेळा तक्रारी दिल्या परंतु बांधकाम विभागाने त्याकडे लक्ष दिले असून आता सुद्धा आम्ही बांधकाम विभागाला तक्रार देणार आहोत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागा विरुद्ध सर्व शेतकरी मिळून आम्ही कोर्टात दाद मागून नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे शेतकरी धामक बेलोरा माजी संरपच प्रविण चौधरी यांनी म्हटले आहे.