अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २३ शुक्रवार
जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुका येथील स्थानिक चांदुर बाजार अमरावती रोडवरील सारडा जीन समोरील नाली बांधकामामुळे व सततच्या पावसामुळे गॅस गोडाऊन परिसर व लगतच्या कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने रस्ता वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.यामुळे प्रत्यक्ष मोक्याच्या ठिकाणावर तहसीलदार गितांजली गरड यांनी रात्री १२ वाजता भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने जेसीबीद्वारे पाणी जाण्याकरिता नाली खोलीकरण केले व बॅरिकेट्स लावून होणारी दुर्घटना टाळण्याकरिता उपाययोजना केल्या व संबंधितांना सूचना देण्यात आल्या.
यावेळी तलाठी भारत पर्वतकर,तालुका भाजप अध्यक्ष मुरली माकोडे,कल्पना गॅस एजन्सी संचालक विलास तायवाडे,दाल मिलचे संचालक कैलास सारडा,राऊत,वर्मा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.प्रसंगी तहसीलदार गितांजली गरड यांनी रात्री १२ वाजता भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने जेसीबीद्वारे पाणी जाण्याकरिता नाली खोलीकरण केले व बॅरिकेट्स लावून होणारी दुर्घटना टाळण्याकरिता उपाययोजना केल्या व संबंधितांना सूचना देण्यात आल्या या त्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल तालुकावासीयांमध्ये कौतुक केले जात आहे.