अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २३ शुक्रवार
दि.२० जुलै गुरुवार रोजी संपूर्ण देशभरातील काहींच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला.तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल तर काळजी करण्याची गरज नाही.याबाबत सध्या कोणताही धोका आलेला नसून ही केवळ केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने घेतलेली एक चाचणी होती असे निष्पन्न झाले आहे.सदरील इमर्जन्सी अलर्ट हा केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने जारी केला होता याबाबतचे सविस्तर परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
सदरील अलर्टच्या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली असून यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे अशी माहिती केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने जरी करण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे कळविण्यात आले आहे.