भंडारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ जुलै २३ शुक्रवार
पीक रोवणीनंतर दुपारच्या सुमारास बांधावर बसून जेवण करीत असलेल्या सहा महिलांच्या अंगावर वीज कोसळून या घटनेत दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत तर चार महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.सदरहू सर्व महिला गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी गावातील असून ही घटना आज दि.२१ जुलै शुक्रवार रोजी अडीच वाजता दरम्यान निलज खुर्द पासून १ किमी अंतरावरील सूर्यप्रकाश बोंदरे यांच्या शेतशिवारात घडली.तर दुसरीकडे मोहाडी तालुक्यातील बोंद्री येथे शेतात रोवनीचे काम करीत असतांना युवराज दामा भिमटे रा.कांद्री यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
आज दि.२१ जुलै शुक्रवार रोजी पवनी तालुक्यात चिचाळ येथे भाताची लागवड करत असतांना वीज कोसळल्याने २० महिला आणि पुरुष जखमी झाल्याची घटना ताजी असतांनाच मोहाडी तालुक्यातही वीज कोसळल्याने दोन महिलांना जीव गमवावा लागला.काही जखमी महिला करडी ग्रामीण रुग्णालयात आणि तुमसर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत आहेत.जखमी महिलांमध्ये सुलोचना सिंगनजुडे,निर्मला खोब्रागडे,बेबीबाई सय्याम व गिताबाई यांचा समावेश आहे.यातील लताबाई गाढवे आणि वच्छला बावनथडे या दोघी जागीच ठार झाल्या आहेत. जखमींवर करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.