यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २३ शुक्रवार
तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका विवाहीत तरुणाने आपल्या शेतात गळफास घेवुन आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना नुकतीच घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात या गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका विवाहीत तरुण अतुल ईश्वर पाटील (बेदारे) वय २८ वर्षे यांने काल दि.२० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास थोरगव्हाण शिवारातील आपल्या शेतातील बांदावर असलेल्या झाडास ठीबक नळीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटनासमोर आली आहे.अतुल ईश्वर पाटील (बेदारे) यांने आत्महत्या का केली? हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही.यावलच्या ग्रामीण रुग्णालयात अतुल पाटील च्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.या घटनेबाबत भारत चावदस पाटील यांनी खबर दिल्यावरून अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस करीत आहे.आत्महत्या केलेल्या तरूणाच्या पश्च्यात आई,पत्नी,एक मुलगी,एक मुलगा असा परिवार आहे.