शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करीत जिल्ह्यात चोपडा फॉर्मसी महाविद्यालयाला उत्कृष्ट कॉलेजचे मानांकन
डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२२ जुलै २३ शनिवार
उच्च शैक्षणिक क्षेत्रात पुण्या मुंबईच्या दिशेने चोपड्याची आगेकूच जोमाने सुरू असून त्याच्याच प्रत्यय नुकताच चोपडा फार्मसी कॉलेजला उत्कृष्ट मानांकन प्राप्त झाल्याने आला आहे.प्राध्यपकांच्या अध्ययनाची पराकाष्ठेने उज्ज्वल यशाची ज्योत तेवत ठेवली जात असून जिल्ह्यात मानाचा तुरा रोवण्यात कॉलेजची घौडदौड सुपरफास्ट सुरू आहे.सदरील मानांकनाने कॉलेज मॅनेजमेंट सह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी गेल्या तीस वर्षांपासून आपली उज्वल निकालाची परंपरा तसेच शासनाच्या नियमांस अधीन राहून आपली गुणवत्ता टिकवून आहे.महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या पदविका ( डी.फार्मसी) विभागातील विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षा २०२३ मध्ये घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाले तसेच महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या एमएसबीटीई मॉनिटरिंगमध्ये महाविद्यालयास उत्कृष्ट मानांकन प्राप्त झाले आहे अशा यशदायी मानांकचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे.यात दोन तपाहुन अधिक काळ मेहनत घेणाऱ्या कॉलेजच्या पारड्यात मेहनतीचे फळ यायला सुरुवात झाली असून लवकरच कॉलेज सर्वांचे एक आशा स्थान राहील अशी ग्वाही प्राध्यापक वर्ग देत आहे.उपरोक्त यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड.संदीप पाटील,उपाध्यक्ष सौ.आशाताई पाटील,सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गौतम वडनेरे,विभाग प्रमुख पियुष चव्हाण व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक अन् विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.