Just another WordPress site

दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२२ जुलै २३ शनिवार

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा तसेच याबाबतचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दि.२१ जुलै शुक्रवार रोजी विधानसभेत दिली आहे.रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी प्रमाणेच आणखी आठ गावे दरडप्रवण क्षेत्रात येत असून तेथील लोकांना त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचाही निर्णय घेण्यात आला.गुरुवारी दुर्घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात अनुभव कथन करतांना त्या भागातील परिस्थिती किती बिकट होती याची माहिती दिली.इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितले.शुक्रवारी सकाळपासून इर्शाळवाडी येथे शोध कार्यास सरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले.इर्शाळ गडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथके,रुग्णवाहिकेसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आले.बचाव करण्यात आलेल्या नागरिकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी आवश्यक सुविधा युक्त ६० कंटेनर्स मागविण्यात आले असून त्यातील ३० कंटेनर्स उपलब्ध झाले आहेत.या कुंटुबांचे कायम पुनर्वसन होईपर्यंत त्यांची या कंटेनर्समध्ये व्यवस्था व इतर मुलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या आदिवासी वाडीमध्ये एकूण ४८ कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ आहे त्यातील सुमारे १७ ते १८ घरांवर दरड कोसळली आहे.बचाव कार्यात ९८ व्यक्तींना सुरक्षित वाचविण्यास यश आले असून २२८ पैकी उर्वरित १०९ व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट नव्हते अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.बचाव कार्यास यशवंती हाइकर्स स्वयंसेवी संस्थेचे २५ स्वयंसेवक,चौक ग्रामस्थ,वरोसे ग्रामस्थ २०,खोपोली नगरपालिकेचे २५ कर्मचारी,चौक ग्रामपंचायत कर्मचारी,निसर्ग ग्रुप पनवेल यांचे स्वयंसेवक तसेच कोलाड रिव्हर राफटर्स यांनी मोलाची कामगिरी बजावली तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह अन्य वचाव तुकडय़ांनी मदत कार्यात झोकून काम केलेल्याचे गौरोद्गारही त्यांनी काढले.इर्शाळवाडी ते पायथ्यावरील बेस कॅम्पपर्यंतचा परिसर पायी चालण्यासाठी साडेतीन तास लागत असल्याने वीज नसलेल्या या परिसरात संपर्क साधण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनने हॅम रेडिओ आणि एनडीआरएफने सॅटेलाइटची मदत घेतल्याचे दिसले.हॅम रेडिओ पाच व्हॅटचे असल्याने हा व्हीएचएफ सेट आहे यातून एकाच वेळी १० किलोमीटर अंतरापर्यंत संपर्क साधता येतो अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली तसेच यातील संपर्क यंत्रणा अँटेना टू अँटेना असल्याने कोणत्याही इंटरनेटविना ही संपर्क व्यवस्था सुरू राहते.एनडीआरएफच्या बचाव दलाची चार पथके शुक्रवारी सकाळपासून कार्यरत होती.इर्शाळवाडी येथील आपद्ग्रस्त कुटुंबांना तात्पुरता निवारा मिळावा यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. चौक येथे मुंबई पुणे महामार्गालगत कंटेनर निवारा शेड उपलब्ध करून दिली जाणार आहेत.आज दि.२२ जुलै शनिवार रोजी सकाळपर्यंत या निवारा शेड सर्व कुटुंबांना हस्तांतरीत केल्या जाणार आहेत.दरड दुर्घटनेमुळे इर्शाळवाडीतील ३० कुटुंब बेघर झाली होती त्यांची सध्या व्यवस्था ही नानिवली गावातील प्राथमिक शाळा व अंगणवाडीत करण्यात आली आहे.बेघर कुटुंबाचे कायम स्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी एमआयडीसी,जेएनपीटी,जेएसडब्ल्यू आदी कंपन्यांसह काही दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून ३२ कंटेनर घरे उपलब्ध करून दिली आहेत.ज्या ठिकाणी ही कंटेनर घरे ठेवली आहेत तिथे पाणीपुरवठयासाठी नळ तसेच विजेचे जोडणी देण्यात आली आहे तसेच २० शौचालये आणि २० स्नानगृहही दाखल झाली आहेत याशिवाय या कुटुंबांना लागणाऱ्या अंथरूण,पांघरूण,कपडे व सर्व गृहोपयोगी वस्तूंचा पुरेसा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.