जळगाव :-पोलीस नायक(जिल्हा प्रतिनिधी)
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज त्यांची बदली करण्यात आली आहे.गुरुवारी राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या त्यात राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली.जळगाव जिल्हाधिकारी म्हणून लातूर मनपाचे आयुक्त अमन मित्तल यांची निवड करण्यात आली आहे.जळगाव जिल्हाधिकारी पदी लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांच्या नियुक्तीचे आदेश प्रधान सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांचे कडून नियुक्तीचे आदेश जारी केले आहे.
अधिक माहिती अशी की,गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली होईल अश्या चर्चा सुरू होत्या.अभिजीत राऊत यांनी आपल्या जिल्हाधिकारी असण्याच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यातील कोरोना चांगल्या रीतीने हाताळला यामुळे त्यांचे राज्यभर कौतुक झाले.मात्र अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाली आहे.जळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत.त्यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे 2015 बॅचचे जिल्हाधिकारी असून त्यांची आजवरची कारकीर्द उत्तम राहिली आहे.