Just another WordPress site

मणिपूर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या- इंडियन लेडी शितलताई गजभिये यांची मागणी

महिलांना अबला समजून अत्याचार करणाऱ्या मणिपूर घटनेचा जाहीर निषेध

अनिल गौर,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.२३ जुलै २३ रविवार

मणिपुर राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे किंवा पहायला मिळतो आहे.गेल्या काही दिवसांपासून यावर राज्य सरकारला जसे पाहिजे तसे नियंत्रण मिळवता आले नाही किंवा तेथील भाजप सरकार राज्य चालवण्यास अपयशी ठरले आहे.दि.४ मे रोजी मणिपुर मधील कांगपोकपी या ठिकाणी दोन आदिवासी महिलांना विवस्त्र व उघड़े करून त्यांची धिंड काढण्यात आली व त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला असाही आरोप आहे.सदरील घटना ही संतापजनक असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे तरी सदरील घटनेची संपूर्ण चौकशी करून संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच तेथील भाजप सरकारचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकाराशी बोलतांना ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष शीतल गजभिये यांनी नुकतीच केली आहे.

मणिपूर राज्यात दिवसेंदिवस हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असून गेल्या दोन महिन्यांपूर्वी कांगपोकपी गावातील दोन आदिवासी महिलांना विवस्त्र व उघड़े करून त्यांची धिंड काढण्यात आली तसेच त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.यावेळी मात्र  संबंधित आरोपींना अटक केली नव्हती परिणामी आता २ महिने उलटल्यावर येथील आदिवासी महिलांचा विवस्त्र करून धिंड काढण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.यावरून तेथील सरकार महिलांबाबत किती उदासीन आहेत हे स्पष्ट होत आहे.सदरहू सदरील घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असून आजही स्त्रिया सुरक्षित नाही याची साक्ष पाहायला मिळत आहे.परिणामी या घटनेची संपूर्ण चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व तेथील भाजप सरकारचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकारांशी बोलतांना ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष शीतल गजभिये यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.